10-01-2018 - 22-03-2018

competition of college students in water projects presentation, model presentation, film presentation and poster presentation 138 students participated from all over maharshtra from all districts details - प्रिय मित्रांनो... > आपल्या क्लब च्या माध्यमातून ' वॉटर ऑलिम्पियाड ' हि कॉलेज युवकांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवत आहोत.... त्या बद्द्दल चर्चा करून पुढील आराखडा आणि कामाची विभागणी ,जबाबदारी इ. साठी ३१ ऑक्टोबर संध्याकाळी ६:३० ते ७:३० वेळेत सेवासदन शाळेच्या सभागृहात आपण भेटूया... मी सर्वांची वाट पहतोय. > > उपक्रमाविषयी > पाणी विषयक समस्या स्थानिक ते वैश्विक झाली आहे आणि येत्या काळात याचे स्वरूप अधिक उग्र होत जाईल हे स्पष्ट जाणवते आहे. > या विषयी युवा पिढीला जाणीव व्हावी इतकेच नव्हे तर या संकटाकडे त्यांनी संधी म्हणून पाहावे आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यावर विविध उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा... या साठी आपण 'वॉटर ऑलिम्पियाड' हे व्यासपीठ त्यांच्या कल्पना, संकल्पना आणि ज्यावर आश्वासनीय प्रकल्प, यांची मांडणी करण्यासाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. > या स्पर्धा महाविद्यालयीन वयोगटासाठी, सर्व शाखांसाठी खुल्या असतील. > यात प्रत्यक्ष प्रारूप (Model), संकल्पना, संशोधन निबंध, तौलनिक अभ्यास(Statical analysis) , निरीक्षणे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पाण्या संबंधी समस्या व उत्तरे मांडता येतील. > या साठी विविध महाविद्यालयांशी संपर्क प्रस्थापित करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यात भाग घेण्यास प्रवृत्त करावे हे आपले प्रमुख काम असणार आहे. > नंतर स्पर्धा, निकाल, प्रदर्शन आणि बक्षिस वितरण ह्याही तुलनेने सोप्या जबाबदाऱ्याही आपल्याला पार पाडायच्या आहेत. > या साठीची आणखी काही माहिती या पत्रा सोबत जोडली आहे. तरी आपण सर्वांनी हे वाचून आपल्या सूचना, सहभाग निश्चित करण्यासाठी चर्चेला उपस्थित राहावे. > > आपला मित्र > सतीश खाडे

Project Details

Start Date 10-01-2018
End Date 22-03-2018
Project Cost 500000
Rotary Volunteer Hours 400
No of direct Beneficiaries 300
Partner Clubs
Non Rotary Partners big fm radio , janeev yuwa foundation, CBP Live TV, SP Pune university
Project Category Water and sanitation