'हितगूज कोड्यांशी,संवाद शब्दांशी'
Meeting Date | 14 Feb 2025 |
Meeting Time | 07:30:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | 'हितगूज कोड्यांशी,संवाद शब्दांशी' |
Meeting Agenda | Entertaing program with informative and loaded with riddles. |
Chief Guest | प्रेसिडेंट अभय देवरे |
Club Members Present | 12 |
Minutes of Meeting | ‘हितगुज कोड्यांशी संवाद शब्दांशी’ हा कार्यक्रम छान झाला .. क्षमा एरंडे, नीलिमा राडकर आणि मंजिरी कर्वे या तिघी बहिणींनी मिळून हा जो आगळावेगळा कार्यक्रम केला त्यावरून मराठी भाषेवर असलेले त्यांचे प्रेम दिसून आले. त्याचे कारण म्हणजे आपली मराठी भाषा आहेच तेवढी समृध्द.. त्यातच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे.. रोटरी मराठी साहित्य संमेलन.. कालच्या शब्दकोड्यांसारखे कार्यक्रम आता रोटरी क्लब मधे नेहमी होतच राहतील यात शंका नाही .. काल या तिघींनी आपल्याला आपल्या बालपणाची सैर घडवून आणली.. एक गोष्ट काल माझ्या लक्षात आली की ...आपल्याच मातृभाषेतले अनेक शब्द आपल्यालाच माहिती नसतात. रोजच्या वापरातील शब्दांच्या व्यतिरिक्त अनेक शब्द आपण विसरलेले असतो. शब्दकोड्यांमुळे अशा अनेक शब्दांना उजाळा मिळतो .. त्याचप्रमाणे म्हणी, गाण्याच्या भेंड्या.. सुभाषिते असे एक ना अनेक असे प्रकार आपल्या बुद्धीला चालना देत असतात.. हे सगळे पाहिले की आपण मराठी असल्याचा आणि मराठीत शिक्षण घेतल्याचा मला खुप अभिमान वाटतो.. काल पाहुण्यांची ओळख रो स्वाती जाधव हिने करून दिली आणि आभार प्रदर्शन रो अमेय यांनी केले.. रो रमाकांत यांनी पण स्वतःचे मनोगत व्यक्त केले.. |