'सप्तसूर '
Meeting Date | 07 Feb 2025 |
Meeting Time | 07:30:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | 'सप्तसूर ' |
Meeting Agenda | Three ladies will play songs on 'Sitar'. |
Chief Guest | Three eminent ladies sitar players. |
Club Members Present | 27 |
Minutes of Meeting | खुप दिवसांनी कार्यक्रमाचा वृत्तान्त लिहीत आहे.. मागच्या महिन्यात जास्त मीटिंग झाल्या नाहीत.. परन्तु सायकल प्रोजेक्ट तसेच MIT येथे 4 आणि 8 किमी मॅरेथॉन स्पर्धा झाली.. त्यावेळी प्रेसिडेंट अभयच्या अनुपस्थितीत सेक्रेटरी अनुराधा आणि स्पोर्ट्स डायरेक्टर संगीता यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी चोख पार पाडली.. ज्याचा वृत्तान्त रो संगीता हिने लिहिलेला होताच.. कालचा कार्यक्रम खरोखरच आगळावेगळा होता..रो सतीश आणि क्षमा कुलकर्णी यांच्या ओळखी मुळे आलेल्या अंजली अंधारे.. अनघा कलमदानी .. भाग्यश्री जाचक या तिघींनी मिळून सप्तसूर हया कार्यक्रमांतर्गत सतारीवर जुनी नवी भक्तिगीते त्याचप्रमाणे फिल्मी गाणी वाजवुन आपल्या सर्वाँना अक्षरशः खिळवून ठेवले.. या तिघी जणी गृहिणी असूनही स्वतःची आवड म्हणून त्यांनी ही कला जोपासली आहे. हे क्षमा यांनी त्यांची ओळख करून देताना सांगितले.. प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून आपली कला जोपासणे हे खरंच सोपं नाही.. काल अभार प्रदर्शन स्वाती महाजन हिने केले. |