'बहु आयामी अत्रे'.
Meeting Date | 17 Jan 2025 |
Meeting Time | 07:30:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | 'बहु आयामी अत्रे'. |
Meeting Agenda | संक्रांतीचे हळदीकुंकू व तिळगूळ समारंभ. |
Chief Guest | माधुरी वैद्य व डॉ. विनिता आपटे. |
Club Members Present | 30 |
Minutes of Meeting | शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी प्रसिद्ध लेखक प्र.के. अत्रे यांच्यावर आधारित 'बहुआयामी अत्रे’ हा दृक्श्राव्य कार्यक्रम, विपुलश्री मासिकाच्या संपादिका माधुरी वैद्य आणि सूत्र संचालन, अभिनय, लेखन आणि पर्यावरण क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या डॉ. विनिता आपटे यांनी अतिशय रंजक पद्धतीने सादर केला. या कार्यक्रमात प्र .के. अत्रेंच्या कविता, त्यांनी लिहिलेल्या नाटकातील सवांद, त्यांच्या चित्रपटातील दृश्ये, विविध राजकीय प्रसंगी त्यांनी टिप्पणी केलेले मार्मिक किस्से यांची सुरेख गुंफण केली होती. उच्च साहित्यिक अभिरुची जपणाऱ्या या कार्यक्रमाने अत्रे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय श्रोत्यांना करून देत खिळवून ठेवले. रो. अलका देशपांडे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि रो. आरती भट हिने उपस्थितांचे आभार मानले. याच कार्यक्रमात पीपी रो. अशोक भंडारी यांच्या हस्ते e-bulletin च्या डिसेंबर अंकाचे प्रकाशन झाले. मकरसंक्राती निमित्ताने आयोजिलेला हळदी कुंकू समारंभ आणि वेशभूषा स्पर्धा जोशात पार पडली. स्त्री गटात प्रथम क्रमांक स्वाती जाधव, द्वितिय क्रमांक नीला वसेकर, तृतीय क्रमांक विभागून रो मोहिनी पवार आणि मेघना बिवलकर यांनी पटकावला. पुरुष गटात डॉ. श्रीकांत पाटणकर हे विजेते ठरले. हळदी कुंकवाची जबाबदारी वर्षा व क्षमा यांनी अतिशय छान सांभाळली. |