पक्षी जीवना बद्दल माहिती. त्यांचे राहणीमान, त्यांच्या जाती, लोक कथेतील त्यांचे स्थान ई. विषयी माहिती.
Meeting Date | 10 Jan 2025 |
Meeting Time | 07:30:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | पक्षी जीवना बद्दल माहिती. त्यांचे राहणीमान, त्यांच्या जाती, लोक कथेतील त्यांचे स्थान ई. विषयी माहिती. |
Meeting Agenda | आपल्या आजूबाजूला असलेल्या रंगीबेरंगी पक्षांची अदभूत दुनिया, पक्षांचे व्यक्तिमत्व, एकमेकांशी असलेले त्यांचे संबंध, त्यांच्या नावांची गंमत अश्या अनेक गोष्टींची माहिती आपल्याला सांगणार आहेत प्रसिद्ध लेखिका प्रतिमा दुरुगकर. रोटरीच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना गौरविण्यात आले आहे. |
Chief Guest | Rtn Pratima Durugakar |
Club Members Present | 20 |
Minutes of Meeting | मागच्या आठवड्यात पहिले मराठी रोटरी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीरित्या पार पडले.. ज्यामध्ये आपल्या कलब ने को होस्ट क्लब म्हणून काम पाहिले.. रो दीपक आणि श्रीकांत बेडेकर यांनी ग दी माडगूळकर यांच्या वरच्या अमृतसंचय या कार्यक्रमात गाणी गायली, रो स्वाती रांजेकर हिने प्रहसन मध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रो विजय पुराणिक यांनी लेखन केलेल्या कवितेला बक्षीस मिळाले तेही रामदास फुटाणे यांच्या हस्ते?.. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.. या सहित्य संमेलनामध्ये शिवाजीनगर क्लबच्या रो प्रतिभा दुरुगकर यांना पण उत्तम लेखिका म्हणून गौरविण्यात आले.. याच प्रतिमाताई काल आपल्या कडे पक्ष्यांची वेगळया प्रकाराने ओळख करून देण्यासठी आल्या होत्या .. आपल्या नेहमीच्या पाहण्यात न आलेले पक्षी .. त्यांचा गुंजारव.. त्यांचे मोहक रंग.. त्यांच्या हालचाली .. घरटे बांधण्याची लगबग.. एकमेकांबरोबर आपल्या भाषेत साधलेला संवाद ..त्याचबरोबर आपल्या साठी एखादे संकट आले असेल तर त्याची पूर्वसूचना देण्याचे काम पण ते करत असतात.. खरच पक्षी हा काही अभ्यासाचा विषय आहे का? असे मला वाटत होते, परंतु कालच्या कार्यक्रमामुळे निसर्गाने प्रत्येक गोष्टीची निर्मिती ही किती विचारपूर्वक केली आहे हे पाहून थक्क व्हायला होते.. असो मी पण एकदम भारावून गेल्यामुळे माझ्याकडून जास्त लिहिले गेले असे वाटते.. परन्तु जी मंडळी काल आली नव्हती त्यांना पण कार्यक्रम कसा झाला हे समजायला पाहिजे ना ... काल प्रतिमा ताई यांची ओळख रो प्रियांकाने करून दिली आणि आभार प्रदर्शन रो प्रकाश यांनी केले.. त्याचप्रमाणे आणखीन एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रो कुंदन काळे याने डॉक्टरेट ही मानाची पदवी मिळवली त्याचे अभिनंदन आणि त्याचा सत्कार तर व्हायलाच हवा.. जो काल प्रेसिडेंट अभय यांच्या हस्ते झाला.. |