First Rotary Marathi Sahitya Sammelan
Meeting Date | 04 Jan 2025 |
Meeting Time | 09:00:00 |
Location | Yashwantrao Chavan Natyagruha. |
Meeting Type | Club Assembly |
Meeting Topic | First Rotary Marathi Sahitya Sammelan |
Meeting Agenda | Two days full program of Sahitya Sammelan. |
Chief Guest | DG Rtn.Sheetal Shah |
Club Members Present | 35 |
Minutes of Meeting | गेले दोन दिवस आपण सर्व रोटरीच्या पहिल्या साहित्यसंमेलनाचा आस्वाद घेत आहोत... * पानिपतकार विश्वास पाटील आणि ज्येष्ठ क्रिकेटीयर चंदू बोर्डे यांचेशी मुलाखातीमधून झालेल्या मनमोकळ्या गप्पा... * यशस्वी लेखनाची सुत्रे या परिसंवादातून शिवराज गोर्ले,श्रीनिवास भणगे आणि वंदनाताई बोकील यांनी केलेले मार्गदर्शन.... * दुसर्या सत्रात झालेले कविसंमेलन भावून गेले..श्री.रामदास फुटाणे यांच्या खुमासदार वात्रटीका..आणि डाॅ.अंजलीताई कुलकर्णी यांचे छानदार सूत्रसंचालन आणि रोटरीच्या सभासदांनी सादर केलेल्या कविता एकदम झकास.. * आजच्या सकाळच्या सत्रात सत्कार झालेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शतायुषी शि.द. फडणीस यांचा जीवनपट स्तिमित करणारा आहे.. * "संगीत कट्यार काळजात घुसली" या नाटकाने तर सर्वांनाच रात्री उशीरापर्यंत खिळवून ठेवले होते...अभिनयाची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. * मिलींद जोशी यांनी घेतलेली अशोक नायगांवकर यांची घेतलेली खुमासदार मुलाखत, विनोदी कविता हास्याचे कारंजे फुलवून गेली आणि रसिक प्रेक्षकांनीही त्याला दिलखुलास दाद दिली.. * AI चा साहित्यावर होणारा परिणाम परिसंवादातून दीपक शिकारपूर आणि सहकार्यांनी AI बद्दल सुरेख आणि सुलभ शब्दात उलगडा केला.. * अमृतसंचय या गदिमांच्या गीतांवर आधारीत बहारदार कार्यक्रमात रोटरीच्या दीपक महाजन आणि आसावरी गोडबोले यांनीही मस्त गाणी सादर केली.. * श्री.भाऊ तोरसेकरांशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा म्हणजे icing on cake च होत्या.. * यजमान क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, राजीव बर्वेजी, मधुमिता वाहिनी, मोहन चौबळजी, सोनाली, संगीता आणि मोहन काकडेजी, सर्व कमिटी मेंबर्स आणि क्लब मेंबर्स तसेच अन्य सहभागी क्लब यांनी या पहिल्या साहित्य संमेलनासाठी प्रचंड मेहनत घेतल्याने सर्वच कार्यक्रम यशस्वी झाले... BEST TEAM WORK.. या पुढेही अशाच दर्जेदार साहित्य संमेलनाची अपेक्षा ठेवून सर्व रोटरीयन्सना लक्ष लक्ष शुभेच्छा.. |