Rotary Business and information on pending Projects of the club.

Meeting Details

Meeting Date 14 Dec 2024
Meeting Time 07:30:00
Location Sevasadan School .
Meeting Type Regular
Meeting Topic Rotary Business and information on pending Projects of the club.
Meeting Agenda T.B.A.
Chief Guest President Abhay Devare
Club Members Present 0
Minutes of Meeting नमस्कार मित्र मैत्रिणींनो ! खूप दिवसांनी आज परत रोटरी वृत्त लिहित आहे.. कारण मागील काही दिवसांपासून आपल्या क्लब मध्ये मीटिंग झाल्या नाहीत.. परंतू इतर ठिकाणी वेगवेगळे सिनर्जी प्रोग्राम झाले. प्रोजेक्ट मध्ये ब्राम्हणोली येथे रो अनिताच्या मार्गदर्शनाखाली एक प्रोजेक्ट झाला ज्यामधे रो डॉ श्रीकांत, विनायक, अभय मायदेव आणि रेणुका पंडित यांनी खूप सहकार्य केले. आपल्या क्लब ची एक खासियत आहे..की कोणाचाही एखादा व्यक्तिगत कार्यक्रम असला की सगळे त्याला पाठिंबा द्यायला हजर असतात. तुमच्या लक्षात आले असेल की मी कोणत्या कार्यक्रमाबद्दल बोलते ते ..स्वाती रांजेकर चा ..... प्रोग्रॅम.. तिने नेवर माइंड नाटकाची पोस्ट टाकली आणि सर्वांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला आणि जवळजवळ ३५ जणांनी तिचे नाटक पाहिले व त्या नाटकाला तिला पारितोषिक पण मिळाले ..( मिळायलाच पाहिजे होते?) इतकेच नाही तर पुढच्या फेरीत selection पण झाले त्याबद्दल प्रथम स्वातीचे मनापासून अभिनंदन .. असे खूप stars आपल्या क्लब मध्ये आहेत.. याचा मला खूप अभिमान वाटतो. दुसरा उल्लेख करायचा म्हणजे कालचा आपल्या क्लब मधील सर्वांची लाडकी मैत्रीण नेहाचा 50 वा वाढदिवस.. ज्यासाठी रो नितीन आणि हर्षल यांचे करावे तेवढे कौतुक आहे.. तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना सर्वांनी बोलुन दाखवल्या, त्यामूळे नेहाबरोबर सगळा हॉल पण भावूक झाला होता.. नितिन ने यानिमित्ताने सर्वाँना मस्त treat दिली. काल आपली सेक्रेटरी अनुराधा Out of Pune असल्यामुळें तिचे कामकाज रो सुमेधाने तिच्या नेहमीच्या शैलीत म्हणजे अत्यंत शांत आणि सौम्य अशा भाषेत केले.. मला खरंच तिचे बोलणे खूप भावते..? एकंदरींत कालचा माहोल, कार्यक्रमासाठीची तयारी पाहून नितीन ने किती कष्ट घेतले याची कल्पना येते.. बाकी जेवण पण खूप चविष्ट होते आणि पदार्थ पण वेगळे होते. त्यात भर म्हणजे आपली मैत्रीण रेखाने सर्वांसाठी खास दत्तजयंती निमित्त प्रसादाचा शिरा आणला होता.. कालचा दिवस सर्वांनी एका वेगळ्या पद्धतीने एन्जॉय केला, मजा आली.