दिवाळी सांगीतिक सभा, दिवाळी पहाट.
Meeting Date | 03 Nov 2024 |
Meeting Time | 07:00:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | दिवाळी सांगीतिक सभा, दिवाळी पहाट. |
Meeting Agenda | दिपावली निमित्ताने प्रथितयश गायकां समवेत दिवाळी पहाट. |
Chief Guest | Rtn. Abhay Devare. |
Club Members Present | 34 |
Minutes of Meeting | लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या या या.... असे म्हणत दीपावलीचे आगमन झाले.. तिच्या स्वागतासाठी आपल्या क्लब ने एक खास असा *सूर दीपावली* हा जुन्या नव्या भावगीतांचा कार्यक्रम ठेवला होता.. खरं तर हा कार्यक्रम दीपावलीच्या सुरुवातीला असायला हवा होता परंतु काही अडचणींमुळे तो रविवारी, ३ नोव्हेंबरला झाला, असो.. या कार्यक्रमा मधील एक गोष्ट अशी होती की.. गाणारे सर्व कलाकार हे नवोदित असूनही त्यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने सर्वांना अक्षरशः खिळवून ठेवले होते ..रो सतीश यांनी म्हटल्याप्रमाणे थंडीच्या दिवसात सकाळी साखर झोपेतून उठून गाण्याच्या कार्यक्रमाला येणे म्हणजे खरंच रसिकते चे लक्षण आहे.. म्हणून मला वाटते की, आपल्या क्लब ला रोटरी क्लब ऐवजी रसिक क्लब म्हणायला पाहिजे ?.. या कार्यक्रमा संदर्भात रो. सुधीर दार्व्हेकर यांच्या बद्दल तर काय सांगायचे? खरं तर या कार्यक्रमाचे पूर्ण श्रेय हे त्यांनाच दिले पाहिजे..कारण या सर्व कलाकारांच्या वेळा आणि मूड ? सांभाळणे म्हणजे आवळ्याची मोट बांधण्या सारखे होते.. हे काम त्यांनीं अत्यंत खुबीने पार पाडले.. असो, हा एक विनोदाचा एक भाग होता.. परंतु कालच्या सूरेल मैफिलीला आपण सर्वांनी मिळून जी भरभरून दाद दिलीत त्यामुळे कलाकारांचा उत्साह खूप वाढला होता.. कोणतीही कला सादर करण्यासाठी रसिकांची दाद किती महत्त्वाची असते हे काल समजले.. रो. प्रकाशने पण सुरेख शिट्ट्या वाजवुन गायकांना प्रोत्साहित केले. रो. आरतीने ही निवेदन करण्यात पण ती बिलकुल मागे नाही हे दाखवून दिले.. सेक्रेटरी अनुराधा ने आरतीची ओळख छान करुन दिली. शेवटच्या गाण्यामुळे विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले होते आणि रो. सतीश यांनी केलेल्या आभार प्रदर्शनामुळे कार्यक्रमाचा शेवट पण खूप सुरेख झाला. काल तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली होती.. जे मेंबर्स आले नव्हते त्यांची अनुपस्थिती खुप जाणवत होती.. परंतु त्यांनी फेसबुक लाईव्ह वर कार्यक्रम पाहिला हे आवर्जून सांगितल्यामुळे छान वाटले .. प्रेसिडेंट अभय बद्दल मी लिहिणे योग्य आहे का नाहीं मला माहीत नाही.. परंतु हा कार्यक्रम उत्तम व्हावा म्हणुन त्याने खूप कष्ट घेतले.. डेकोरेशन, रांगोळी, पणत्या आणि रसिकांची लक्षणीय उपस्थिती सुद्धा पाहिजे असा त्याचा आग्रह होता..त्याच्याबरोबर अर्थातच अनुराधा, सतीश, आरती यांनी पण त्याला खूप मदत केली. काल दिवाळीचा शेवटचा दिवस असल्यामुळें फराळ तर पाहिजेच ना... आणि त्याच्या सोबत गरम उपमा आणि गोड लवंग लतिका यामुळे फराळाची मजा वेगळीच होती.. |