एक मनोरंजक संध्याकाळ.
Meeting Date | 25 Oct 2024 |
Meeting Time | 19:00:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | एक मनोरंजक संध्याकाळ. |
Meeting Agenda | सभासदां कडून मनोरंजक किस्से. |
Chief Guest | Rtn. Abhay Devare |
Club Members Present | 27 |
Minutes of Meeting | कालचा आपला कार्यक्रम एकदम छान झाला.. याबद्दल तुम्ही माझ्याशी सहमत असाल. आतापर्यंत गाण्याचे प्रोग्राम खूप वेळा झाले असल्यामुळे अभयला आणि मला एक आयडिया सुचली.. आपल्याच क्लब मधील कलाकार मंडळींना बरोबर घेऊन एक आगळावेगळा कार्यक्रम करायचा ज्यामधे त्यांनी आपल्या आयष्यातील विनोदी प्रसंग किंवा काही विनोदी आठवणी सगळ्यांबरोबर शेअर करायच्या .. सुरुवातीला प्रोग्राम कसा होईल याबद्दल थोडी शंका वाटत होती. परंतू पाककला स्पर्धा असो किंवा गाण्याचा प्रोग्राम.. गरबा/ दांडिया असो नाहीतर कालच्या सारखा हास्यविनोद कार्यक्रम... आपला क्लब कशातही मागे नसतो..हे कालच्या कार्यक्रमा मधून पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्यामधे रो सतीश कुलकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले विनोदी अनुभव अतिशय सहजपणे सांगितले. रो मनोज ने त्यांच्या डॉक्टरी पेशातील पेशंटबरोबरचे विनोदी किस्से सांगीतले. रो. मिलींद ने त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील विनोदी अनुभव सांगितले आणि रो संजीवनी हिने छोट्या मुलांबरोबर घडलेले विनोदी प्रसंग सांगीतले आणि रो प्रकाश यांनी पण कॉलेज आयुष्यातील विनोदी प्रसंग हुबेहुब वठवले.. एवढेच नाही तर रोटरी नाट्य स्पर्धत आपल्या क्लबने उत्कृष्ट एकांकिका सांघिक दुसरे बक्षीस, Rotaract category पहिले बक्षीस, लक्षवेधी भूमिका पहिले बक्षीस, उकृष्ट दिग्दर्शक तिसरे बक्षीस, उत्कृष्ट लेखक उत्तेजनार्थ बक्षीस अशी खणखणीत पाच बक्षिसे पटकावली हे पाहिल्यानंतर सगळे आपल्या क्लबला *Vibrant Club* का म्हणतात हे समजले.. एकांकिका स्पर्धेतील सर्व कलाकारांचे छोटीशी गिफ्ट देऊन क्लब तर्फे कौतुक केले. त्यामधील काही मंडळीची अनुपस्थिती काल जाणवत होती .. एकंदरित कालची संध्याकाळ खूप वेगळी आणि छान गेली... सर्वांनी खुप एन्जॉय केले... वेळेअभावी रो रवी रांजेकर यांचे विनोद ऐकता आले नाहीत. त्याबद्द्ल माझी थोडी निराशा झाली ?... नेहमीच्या जेवणाऐवजी काल दही वडा, दडपे पोहे आणि कोथिंबीर वडी असा वेगळा बेत ठेवला होता.. जो सगळयांना आवडला. |