1) Recipe competition. 2) Know your Rotarian.

Meeting Details

Meeting Date 20 Sep 2024
Meeting Time 18:30:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic 1) Recipe competition. 2) Know your Rotarian.
Meeting Agenda 18.15 to 19.15 Pak Kala Spardha.20.00 to 21.15 Know your Rotarian.
Chief Guest President Abhay Devare.
Club Members Present 15
Minutes of Meeting वेगवेगळ्या उपक्रमाव्दारे आपण क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य तर करतोच.. पण त्याचबरोबर आपल्या क्लबमधील मंडळींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सुद्धा आपण काही उपक्रम करत असतो.. असाच एक उपक्रम म्हणजे पाककला स्पर्धा.. वेगवेगळे मिलेट्स वापरून गोड आणि तिखट पदार्थ असावा ही या स्पर्धेची खासियत होती... नुसते पदार्थ बनविणे नाही तर त्याची आकर्षक मांडणी, चव व त्यांच्यामधील पोषणमूल्य जपणे यांचाही त्यात समावेश असावा अशा अटी ठेवून काल आपल्या क्लब मधे पाककला स्पर्धा घेतली होती.. परीक्षक म्हणुन आपलीच मैत्रीण Ann नीला दारव्हेकर हिला आपण बोलावले होते.. त्यामुळे स्पर्धा एकदम खेळीेमेळीच्या वातावरणात पार पडली. खरोखर मिलेट्स वापरून इतके छान आणि चविष्ट पदार्थ बनू शकतात हे आपल्याला काल समजले.. यामध्ये पहिले तीन नंबर आणि दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली गेली.. रो. आरतीने बनवलेले मुग, सोयाबीन व पालक युक्त oil-free दहीवडे आणि पोहे व मुगडाळ वापरून केलेली खीर यास पहिले बक्षीस.. दुसरे बक्षीस रो. सुनिल पिंपळीकर यांनी बनवलेल्या पाच रव्यांनी युक्त असलेला असा प्रसादाचा शिरा आणि खुसखुशीत थालिपीठ या पदार्थांना मिळाले.. तिसरा क्रमांक स्वाती रांजेकरने मिलेटस वापरून बनवलेले कटलेट आणि पौष्टिक केक ला मिळाला.. उत्तेजनार्थ बक्षिसे शरद लागू यांच्या विविध सॅलड्स वापरून केलेली भेळ आणि ओट्स खजूर ब्राऊनी, आणि सुमेधाने बनवलेला मिलेट्स उपमा आणि नाचणीचे आंबिल याला देण्यात आले.. अलका, सतिश, नेहा यांचे पदार्थ पण छान होते.. कालच्या स्पर्धेत पुरुष पण पाक कौशल्यात कमी नसतात हे त्यांनी दाखवून दिले ?.. आपलीं परीक्षक नीला हिची ओळख सेक्रेटरी अनुराधाने करुन दिली.. त्यानंतर Know Your Rotarian या कार्यक्रमांतर्गत रो. आरतीने रो. विजय आणि स्मिता पुराणिक यांची मुलाखत घेतली आणि त्यामुळे त्या दोघांची नव्याने ओळख झाली... काल प्रेसिडेंट अभयच्या अनुपस्थितीमध्ये रो. रवी रांजेकर यांनी त्यांच्या नेहमीच्या खुमासदार शैलीने कामकाज पाहिले... आणि चविष्ट मिसळीने कार्यक्रमाचा शेवट झाला