प्रसिद्ध कॉर्पोरेट कीर्तनकार* *निरूपणकार श्री. समर्थ भक्त* *श्री. समीर लिमये* यांचा कार्यक्रम
Meeting Date | 30 Aug 2024 |
Meeting Time | 06:30:00 |
Location | 'Punyai 'Hall, Proud road, Pune. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | प्रसिद्ध कॉर्पोरेट कीर्तनकार* *निरूपणकार श्री. समर्थ भक्त* *श्री. समीर लिमये* यांचा कार्यक्रम |
Meeting Agenda | 7 PM to 9PM Corporate Kirtan. |
Chief Guest | DG Sheetal Shaha & Sameer Limaye. |
Club Members Present | 32 |
Minutes of Meeting | आजकाल networking हा शब्द सगळीकडे ऐकायला मिळतो.. आणि याच शब्दाचा मनाचे श्लोक आणि दासबोध यासारख्या महान ग्रंथाशी संबंध लावुन श्री समीर लिमये यांनी काल समर्थांचे नेटवर्किंग हा कार्यक्रम प्रस्तुत केला,.काल अकरा क्लब ची सिनर्जी मीटिंग होती त्यात रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर रोटरी क्लब ऑफ पुणे युवा रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग रोटरी इ क्लब ऑफ पुणे डायमंड रोटरी क्लब ऑफ पुणे बावधन एलाईट हे क्लब involve होते आपल्या महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभली आहे.. हे आपल्या सर्वांना महिती आहे.. यामधील श्री समर्थ रामदास यांनी माणसाच्या मनाचा आणि स्वभावाचा विचार करून मनाचे श्लोक आणि दासबोध असे ग्रंथ लिहिले ज्यातील अनेक श्लोक आजही आपल्या रोजच्या जीवनात मार्गदर्शक ठरतात.. श्री समीर लिमये यांनी आपल्या ओघवात्या आणि शुध्द वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करुन समर्थांचे networking कशा प्रकारे योग्य आहे याचा विचार करायला प्रवृत्त केले .. अशा महान व्यक्तीचा सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवून बहुमान केला.. कालच्या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रो. शीतल शहा त्याच्रमाणें District Vocational Director रो. मधुमिता बर्वे उपस्थित होते.. कालच्या कार्यक्रमाचे रो. कविता अभ्यंकर यांनी अगदी नेटकेपणाने सूत्रसंचालन केलें.. काल श्री समीर लिमये यांना रो. श्री शीतल शहा यांच्या शुभहस्ते मानपत्र देवून सन्मानित केले गेले.. ज्याचे शब्दांकन रो आरती हिने केले होतें.. समीर यांची ओळख आपली सेक्रेटरी रो. अनुराधा हिने अत्यंत वेचक शब्दात केले.. आभार प्रदर्शनाची जबाबदारी कर्वेनगर क्लबचे प्रेसिडेंट रो. दीपक थिटे यांनी उत्तमपणे पार पडली.. कालचा कार्यक्रम पुण्याई च्या रुचकर जेवणाने उत्कृष्ट रीतीने पार पडला. |