Vocational Excellance Award given to Shri. Satish Paknikakar - Prakash Yatri/ Audio Video program

Meeting Details

Meeting Date 23 Aug 2024
Meeting Time 07:30:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Vocational Excellance Award given to Shri. Satish Paknikakar - Prakash Yatri/ Audio Video program
Meeting Agenda Audio, Video Program jointly with RCPGandhi Bhavan. RCP KarveNagar
Chief Guest Satish Pakanikar
Club Members Present 32
Minutes of Meeting 19 ऑगस्ट रोजी दरवर्षी *जागतिक छायाचित्र दिवस* साजरा केला जातो..ह्या दिवसाचे औचित्य साधून काल आपल्या क्लब मधे विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले ज्येष्ठ प्रकाशचित्रकार श्री. सतीश पाकणीकर यांचा *प्रकाशयात्री* हा दृकश्राव्य कार्यक्रम सादर आयोजित केला होता.. कालची मीटिंग ही तीन क्लबनी मिळून केलेली सिनर्जी मीटिंग होती.. असे म्हणतात की, एक फोटो, एक हजार शब्द बोलुन जातात.. अर्थात यामागे प्रकाशचित्रकाराचे कौशल्य आणि दृष्टिकोनही महत्त्वाचा असतो.. त्यामुळेच असे गुण असलेल्या, सवाई गंधर्व सारख्या संगीत महोत्सवाबरोबर असंख्य प्रदर्शनातून तसेच श्री. पु ल देशपांडे, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, आणि श्रीमती गंगुबाई हनगल यांच्या टपाल तिकिटासाठी सतीश यांनी काढलेल्या प्रकाशचित्राची निवड करुन भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय पातळीवर पण गौरवांकित केले.. आजपर्यंत 525 कलावंतांची 85000 हुन अधिक छायाचित्रे त्यांच्या कॅमेऱ्याने टिपली असल्यामुळे *प्रकाशयात्री* हे नांव त्यांच्यासाठी सार्थ आहे ..अशा कलावंतांचा सन्मान करणे ही आपल्या क्लबची प्रथाच आहे.. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर व रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन यांच्या वतीने मानपत्र (Vocational Excellence Award) देऊन श्री सतीश पाकणीकर यांना सन्मानित केले. सुरुवातीला प्रमुख पाहुणे श्री. सतीश पाकणीकर यांची ओळख गांधी भवन क्लबच्या रो. शशांक टिळक यांनी करून दिली. या मानपत्रामधील शब्दांची गुंफण प्रेसिडेंट अभय देवरे यांचे मेहुणे डॉ. जयंत पाठक यांनी केली होती आणि त्याचे वाचन रो. मिलींद बिवलकर याने त्याच्या दमदार शैलीत केले.. कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची जबाबदारी रो. सतीश कुलकर्णी यांनी सांभाळली आणि कर्वेनगर क्लबच्या रो. दीपक थिटे यांनी सर्वांचे आभार मानले.. कार्यक्रमाला ९२ लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा दर्जा सिद्ध केला. फेलोशिप कमिटीने वेगळा मेनू ठेवून सगळयांना तृप्त केलें.