श्रावणसरी

Meeting Details

Meeting Date 09 Aug 2024
Meeting Time 07:30:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic श्रावणसरी
Meeting Agenda श्रावण महिन्यातील सणावर आधारित, आरती भट लिखित आणि आपल्याच मैत्रिणींनी सादर केलेला श्रावणसरी हा खास कार्यक्रम होणार आहे. (आरती भट आपल्याच क्लब ची मेंबर आहे.) नंतर स्वादीष्ट जेवण आहे.
Chief Guest President Abhay Devare
Club Members Present 67
Minutes of Meeting परवा शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी झालेला, आरती भट लिखित "श्रावणसरी" हा कार्यक्रम तुम्हा सर्व मैत्रिणींच्या उपस्थिती मुळे आणि सहकार्यामुळे उत्तमरीत्या पार पडला.. Ann अपर्णा आणि अनामिका यांनी आपल्या सर्व मैत्रिणींना हळदीकुंकू आणि अत्तर व फुटाणे देवून आपल्या क्लब मध्ये श्रावणी शुक्रवार साजरा केला. Ann स्वाती जाधव, रेखा, स्मिता आणि क्षमा कुलकर्णी, व रो. प्रियांका, संगीता आणि आरती यांनी श्रावणसरी हा कार्यक्रम अतिशय छान आणि सूत्रबद्ध पद्धतीने सादर केला.. रो श्रीकांत बेडेकर, संगीता आणि वर्षा यांनी श्रावणा संबंधी गायिलेली गाणी नेहमीप्रमाणेच छान व श्रवणीय होती. त्याचबरोबर रो स्वाती रांजेकर, आरती आणि संगीता यांनी निवेदनाची बाजु पण खूप छान सांभाळली.. रो प्रकाश यांचे बासरी वादना मुळे वातावरण भारावून गेले होते.. रो. आरती ने छान संहिता लिहून आपल्या ७-८ मैत्रिणींना बरोबर घेवून एक सुरेख कार्यक्रम सादर केला, त्यासाठी तिचे खूप कौतुक आहे. काल आपल्या कुटुंबात मिनू खरोसेकर या मैत्रिणीचे आपण स्वागत केले.. आपली मैत्रीण रो स्नेहा हिने आपल्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडून उत्तम मार्कांनी B. Ed. पूर्ण केले तिचे पण कौतुक केले गेले. आपल्या क्लब मधील दोन मैत्रिणी क्षमा आणि स्मिता यांचा पेहराव खूप छान दिसत होता.. म्हणून त्यांना पण गिफ्ट देवून सन्मानित केले गेले. आपल्या क्लब मधील रो. तुषार व सोनाली आचार्य यांची कन्या आंजुली आचार्य हिने 7 जून मधील तरुण भारत या दैनिकांमध्ये "अन् ते दिवस" नावाचा खूप छान लेख लिहिला होता. त्याचप्रमाणे मनिष व रंजना पाटील यांची कन्या निधी हिने गाण्याच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले होते..या दोघींचे कौतुक त्यांच्या अनुपस्थितीमुळे करता आले नाही. रो वर्षा हिच्या पुढाकारामुळे सुंदर व मुलायम पुरणपोळी व गरमागरम कोथिंबीर वडी असा खास महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेता आला. आजच्या कार्यक्रमाला 67 एवढी उपस्थिती कार्यक्रमाची घेतली गेलेली दखल पटवून देत होती.