Vocational excellence Award - Singer Manjusha Patil.
Meeting Date | 21 Jul 2024 |
Meeting Time | 19:00:00 |
Location | Sevasadan English medium School, Nr. Deenanath hospital,Erandawane,Pune 4 |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Vocational excellence Award - Singer Manjusha Patil. |
Meeting Agenda | Vocational Excellence Award presentation to Ms Manjusha Patil. A Synergy meeting with RCP Wisdom, RCP Lokmanya Nagar, RCP Pashan, RCP KarveNagar. |
Chief Guest | Singer Manjusha Patil |
Club Members Present | 100 |
Minutes of Meeting | काल सुरुवातीलाच सेवासदन मध्ये प्रवेश केल्याबरोबर श्री विठ्ठलाच्या सुरेख रांगोळीने वातावरण विट्ठलमय होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर हॉल मध्ये कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी वातावरण निर्मितीसाठी कार्यक्रमाला अनुरूप असे अभंगाचे सुर रेकॉर्ड वर ऐकू येत होते. रो. विनायक यांनी सर्वांच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावून वातावरण अजून सुगंधित व भक्तिमय केले. या कार्यक्रमासाठी रो. भावना हिने विठ्ठलाची सुरेख मूर्ती पाठवली होती. रो. रेणुका हिने गालिचा आणून बैठकव्यवस्था सुशोभित करण्यास मदत केली. रोटरी क्लब ऑफ विजडमचे प्रेसिडेंट रो. निलेश यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रोटरी क्लब कर्वेनगरचे प्रेसिडेंट रो. दीपक यांनी विदुषी मंजुषा पाटील यांची ओळख करून दिली. सेक्रेटरी रो. अनुराधा हिने निवेदिका स्नेहल दामले यांची ओळख वेचक आणि सोप्या भाषेमध्ये करून दिली. त्यानंतर विदुषी मंजुषा पाटील यांनी आपल्या सुरेल आणि भक्तिमय अभंगवााणीने एक तासभर श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवले. अभंगवाणी नंतर रोटरी क्लब लोकमान्यनगरचे प्रेसिडेंट रो. अविनाश यांनी मंजुषा पाटील या Vocational Excellence Award साठी कशा योग्य आहेत ते विषद केले. त्यानंतर यावर्षीचा Vocational Excellence Award सौ. मंजुषा पाटील यांना प्रेसिडेंट अभय देवरे व इतर चार प्रेसिडेंटच्या हस्ते देण्यात आला. रो. रवी रांजेकर यांनी शब्दांची सुंदर गुंफण केलेले मानपत्र सौ. मंजुषा पाटील यांना देण्यात आले. मानपत्राचे वाचन रो. संगीता हिने आपल्या दमदार शैलीत केले. सुंदर मैफलीची सांगता पण मोदकाच्या सुग्रास भोजनाने झाली. अशाप्रकारे काल आपण पाच क्लब मिळून केलेला सिनर्जी प्रोग्राम अभंगवाणी हा मंत्रमुग्ध करणारा होता हे आपण सर्वांनी कार्यक्रमाच्या शेवटी उभे राहून सौ मंजुषा पाटील यांना मानवंदना दिलीत यावरून लक्षात आले. शेवटी रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम च्या सेक्रेटरी पूजा वाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी रो. सुधीर दारव्हेकर यांचे योगदान बहुमोल होते. |