Installation of incoming President -2024~25
Meeting Date | 09 Jul 2024 |
Meeting Time | 19:00:00 |
Location | Rajlaxmi Sabhagriha, Near Guruganesh Nagar, Kothrud, Pune 411038 |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Installation of incoming President -2024~25 |
Meeting Agenda | Installation of the New President Rtn Abhay Devare, Secretary Rtn Anuradha Kale & Treasurer Rtn Nagesh Salgare along with the Board of Directors for RY 2024~25 |
Chief Guest | D G Rtn Sheetal Shah |
Club Members Present | 101 |
Minutes of Meeting | काल दिनांक 9 जुलै 2024 रोजी राजलक्ष्मी सभागृह येथे रोटरी क्लब, सिंहगड रोड क्लबचे 2024-25 या वर्षासाठीचे नवोदित प्रेसिडेंट रोटेरियन अभय देवरे व सेक्रेटरी रोटेरियन अनुराधा काळे यांचा इन्स्टॉलेशन प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रोटेरियन शीतल शहा, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट 3131, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर फर्स्ट लेडी रागिणी शहा व असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन संज्योता मालपाणी उपस्थित होत्या. डिस्ट्रिक्ट 3131 चे अनेक ऑफिसर्स व आपल्या क्लबचे सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनीही आपली उपस्थिती नोंदविली. भारती विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर श्री विवेक सावजी व सौ सावजी ही उपस्थित होते. सर्वप्रथम गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ईशस्तवन प्रस्तुत केले गेले. 2023-24 या वर्षीच्या प्रेसिडेंट रो. लता शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व गेल्या वर्षीच्या कार्यक्रमांचा व योजनांचा आढावा घेतला. त्याचबरोबर 2023-24 या वर्षाचे सेक्रेटरी रो. अभय देवरे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नवीन रोटेरियन वर्षातील प्रेसिडेंट रो. अभय देवरे यांना, मागील रोटेरियन वर्षातील प्रेसिडेंट रो. लता शिंदे यांनी पदभार सुपूर्द केला. तसेच मागील रोटेरियन वर्षातील सेक्रेटरी रो. अभय देवरे यांनी, नवीन रोटेरियन वर्षातील सेक्रेटरी रो. अनुराधा काळे यांना पदभार सुपूर्द केला. नवीन रोटेरियन वर्ष 2024 25 मधील बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची ओळख सर्वांना करून देण्यात आली व त्यांचेही इंस्टॉलेशन करण्यात आले . त्यानंतर प्रेसिडेंट रो. अभय देवरे यांनी या वर्षातील नवीन योजनांची व कार्यक्रमांची माहिती सर्वांना करून दिली. तसेच प्लेयिंग इलेव्हन मध्ये भाग घेवून क्लबला दिलेली सर्व टार्गेट्स पूर्ण करण्याचे आश्वासन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन शीतल शहा यांना दिले. असिस्टंट गव्हर्नर रो. संज्योता मालपाणी यांनीही आपल्या क्लब च्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले व पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी फाऊंडेशन ला देणगी दिलेल्या रोटेरियन्स चा सत्कार केला गेला. तसेच विविध उपक्रमांमध्ये आर्थिक हातभार लावून उपक्रम यशस्वी ज्यांनी केले त्यांचाही सत्कार करण्यात आला. कालच्या कार्यक्रमा अंतर्गत जुलै, 2024 या महिन्याच्या बुलेटिनचे प्रकाशन प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शीतल शहा यांच्या शुभ हस्ते झाले. कालच्या कार्यक्रमाला एकूण 157 जण उपस्थित होते. कालच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले गेले. काही भावी मेंबर्स ची नावेही घोषित करण्यात आली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रो. शीतल शहा यांनी प्रेसिडेंट रो. अभय देवरे यांचे स्वागत करुन आगामी वर्षात त्यांच्या क्लब कडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच रोटरी क्लब संबंधी अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. क्लब ला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांनी प्रेसिडेंट रो. अभय देवरे यांना सिल्व्हर स्टार म्हणून त्यांचे कौतुक केले. आणि आत्ता पर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीचे कौतुक केले. आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. रो. हर्षवर्धन भुसारी यांनी सूत्र संचालनाची जबाबदारी लीलया पेलली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रो. प्रियांका लागू, स्वाती जाधव, अपर्णा, रंजना, श्रेया, संजीवनी, सुप्रिया भुसारी, रो. अनुराधा, नेहा चवरे, रो. स्नेहा जाधव यांचे सहकार्य लाभले. तसेच रो. अमोल पासलकर यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली. राजलक्ष्मी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची सांगता चविष्ट जेवणाने झाली. |