Baverchi Day, Induction of New Member

Meeting Details

Meeting Date 04 May 2024
Meeting Time 19:30:00
Location Hotel Spice Garden, Pune
Meeting Type Regular
Meeting Topic Baverchi Day, Induction of New Member
Meeting Agenda साप्ताहिक सभा क्रमांक ३९ वार : शनिवार दिनांक: ०४.०५.२०२४ वेळ : संध्याकाळी ७.१५ पासून कार्यक्रम संपेपर्यंत स्थळ: हॉटेल स्पाइस गार्डन MIT कॉलेज रोड, पुणे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वजण वाट पाहत असलेला आपला "बावर्ची डे" कार्यक्रम आपण शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी साजरा करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपले नामांकीत बल्लवाचार्य त्या दिवशी त्यांचे पाककौशल्य पणाला लावून विविध पाककृती आपल्यासाठी सादर करणार आहेत. आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच त्या दिवशी एका सरप्राइज कार्यक्रमाचे पण आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे त्या दिवशी आपले एक नवीन सभासद श्री. अभिषेक खरोसेकर यांचे Induction सुध्धा करण्याचे योजिले आहे.
Chief Guest
Club Members Present 40
Minutes of Meeting Surprise even was - 25th Wedding Anniversary of Rtn Ajit and Shreya Apte. प्रिय मित्र मैत्रिणींनो, काल अजित श्रेयाच्या शुभविवाहानंतर सादर केलेल्या कार्यक्रमास आपण सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार .. तसेच श्रीकांत,सोनाली, संगीता , तुषार, अमेय यांनी कार्यक्रमात ऐन वेळेस सहभागी होऊन कार्यक्रम रंगतदार केला याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.. Shreya Apte says following: मन भरून आलं आमच्याकडे शब्द नाही.जे आम्ही 25 वर्षाला फक्त एक संख्या मानली ते तुम्ही दिमाखदार सोहळा बनवले. काय वरात,काय मिरवणूक,काय सजावट,काय नटून थाटून आलेले तुम्ही,काय रुखवत(मुलगा तुमच्या),काय अंतरपाट,काय मंगलाष्टक आणि हार...vdo, फोटो ..बापरे लग्नच लावून टाकले राव??!! आत्ता पुढच्या वर्षांपासून 5 मे ऐवजी 4 मे ला anniversary करू? आम्ही हरवून गेलो,भारावलो तुमच्या प्रेमामुळे. मी स्वतः differently abled असूनही ज्या विवाह विधिमंत्रांचा वचनानुसार धर्मे, अर्थे,कामे,मोक्ष प्राप्तीच्या वाट चालिकडे एकमेकांना नातीचारामि म्हणत एकमेकांना अनुकूल सहजीवन आनंदाने जगलो,केवळ दैवी कृपा आणि आपल्या सारखा प्रेमळ माणसांचा संगतीमुळे. संघर्ष आहे. सांतृप्ती आहे. विश्वास,अभिमान, आदर 100 पटीने दृढ झालेला आहे. केवळ सत्कर्म,प्रामाणिकपणे काम करण्यासाठी सदैव एकमेकांना प्रेरित करत आलो..पुढेही असे सन्मार्गावर आयुष्यभर सहजीवनाचा आनंद लाभो यासाठी त्या भगवंताचा चरणी प्रार्थना.पुनश्च आपल्या सर्वांपुढे आम्ही नतमस्तक आहोत..फक्त आशीर्वाद द्या Thanks to all.