Womens Day with RCP Wisdom (चार दिव्यांग महिलांचा सत्कार व एका पोलिस इन्स्पेक्टर महिलेचा सत्कार)

Meeting Details

Meeting Date 08 Mar 2024
Meeting Time 19:30:00
Location Punyaii Sabhagruh, 2nd floor, Paud Road, Pune-411038
Meeting Type Regular
Meeting Topic Womens Day with RCP Wisdom (चार दिव्यांग महिलांचा सत्कार व एका पोलिस इन्स्पेक्टर महिलेचा सत्कार)
Meeting Agenda मीटिंग क्र. ३२ वार : शुक्रवार दिनांक : ८ मार्च २०२४ स्थळ :. पुण्याई सभागृह पौड रोड, पुणे वेळ : संध्या: ७.०० ते ७.३० चहा बिस्किट्स संध्या. ७.३० ते ७.४५ रोटरी बिझनेस संध्या. ७.४५ ते ८.४५ Women's Day निमित्त एक खास कार्यक्रम चार दिव्यांग महिलांचा सत्कार व एका पोलिस इन्स्पेक्टर महिलेचा सत्कार आपण करणार आहोत. ही मीटिंग जॉइंट मीटिंग असणार आहे. आपल्या क्लब बरोबर रोटरी क्लब ऑफ wisdom पण सामील होत आहे या विशेष कार्यक्रमा साठी. विशेष सूचना : ८ मार्चला मीटिंगला येणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी एक सरप्राइज गिफ्ट आहे, तरी ही मीटिंग चुकवू नये ही Anns आणि Lady Rotarian यांना विनंती.. संध्या. ८.४५ नंतर फेलोशिप (त्या दिवशी महाशिवरात्र असल्याने सगळ्यांनाच उपवासाची फेलोशिप असेल) तरी आपण बहुसंख्येने वेळेत उपस्थित राहावे ही विनंती. अभय देवरे सेक्रेटरी
Chief Guest Joint Meeting with RC of Wisdom
Club Members Present 40
Minutes of Meeting रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड आणि रोटरी क्लब ऑफ Wisdom यांच्या संयुक्त विद्यमाने ,शुक्रवार दिनांक 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .अपंगत्वावर मात करून ,समाजात भरीव कार्य करून ,एक वेगळे स्थान निर्माण केलेल्या दीक्षा दंडे ,सुचित्रा खरवडीकर ,प्रिया नहार ,अंकिता आर्वीकर या चार दिव्यांग महिलांना यावेळी गौरविण्यात आले .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस निरीक्षक मा .सुनीता लक्ष्मण रोकडे आणि डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो .टीना रात्रा (DEI )उपस्थित होत्या .मा .रोकडे मॅडम यांनी पैश्याची online होणारी फसवणूक टाळण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले.रो .टीना रात्रा मॅडम यांनी सकारात्मक दृष्टीकोनाने आपण आपल्या न्यूनतेवर मात करू शकतो हा विचार त्यांचा प्रभावी मनोगतातून व्यक्त केला . राष्ट्रगीतआणि रोटरी ची Four Way झाल्यानंतर ,रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड च्या प्रेसिडेंट रो .लता शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .सत्कारार्थींची ओळख करून दिल्यानंतर त्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला .पाहुण्यांच्या मनोगतानंतर रोटरी क्लब Wisdom चे प्रेसिडेंट रो .सारंग बालंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले .RCP Wisdom च्या फर्स्ट लेडी रो .शिल्पा बालंखे यांनी आणि RCP सिंहगड रोड च्या सभासद संगीता पिंपळीकर यांनी सूत्रसंचालन केले .जागतिक महिला दिनानिमित्त ,उपस्थित महिलांसाठी खास भेटवस्तू चे आयोजन करण्यात आले .त्याचा दिवशी महाशिवरात्र असल्याने उपवासाच्या झकास fellowship ने कार्यक्रमाची सांगता झाली .एकंदरीत हा कार्यक्रम संस्मरणीय झाला .चार दिव्यांग महिलांचा सत्कार व एका महिला पोलिस इन्स्पेक्टर चा सत्कार केला. दिव्यांग महिलांचे भाषण ऐकताना असे वाटले की आपण धडधाकट असूनही किती कुरकुर करतो. त्यांनी किती प्रतिकूल परीस्थितीवर मात केली. They became our inspiration for future. दोन्ही क्लबचे मिळून ९० मेम्बर्स होते. खूपच छान कार्यक्रम झाला. Rtn. Rina Ratra, District Director, DEI was Chief Guest of the programme.