Story of Kadambari (a transgender)

Meeting Details

Meeting Date 23 Feb 2024
Meeting Time 19:30:00
Location Seva Sadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Story of Kadambari (a transgender)
Meeting Agenda *मीटिंग क्र. ३०* *वार :* शुक्रवार *दिनांक :* २३ फेब्रुवारी २०२४ *स्थळ :*. सेवासदन शाळा *वेळ :* संध्या: ७.३० ते ८.०० *चहा बिस्किट्स* संध्या. ८.०० ते ८.१५ *रोटरी बिझनेस* संध्या. ८.१५ ते ९.१५ *कथा कादंबरीची* श्रीमती कादंबरी नावाच्या एका वेगळ्या व्यक्तीच्या मुलाखतीतून आपल्याला तिच्या जीवनप्रवासाची ओळख होणार आहे. मुलाखत रो. भावना दफ्तरदार घेणार आहेत. *विशेष सूचना* : उद्या मीटिंगला येणाऱ्या प्रत्येक फॅमिलीसाठी एक सरप्राइज गिफ्ट आहे, तरी मीटिंग चुकवू नये ही विनंती.. संध्या. ९.१५ नंतर *फेलोशिप* आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती. अभय देवरे *सेक्रेटरी*
Chief Guest Kadambari
Club Members Present 40
Minutes of Meeting कथा कादंबरीची एक अस्वस्थ करणारा अनुभव पुरुषाचा जन्म घेऊन नंतर स्त्री झालेल्या कादंबरी नामक कुणा तृतीयपंथीय स्त्रीची मुलाखत हा कार्यक्रम अगदी आवर्जून क्लब मिटींगला यावे असा वाटला नव्हता. पण दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय हा कार्यक्रम पाहून आला. माझ्यासाठी या कार्यक्रमाचं महत्व म्हणजे मी स्वतःला अभिमानाने समाजातला एक प्रगल्भ पुरोगामी नागरीक समजायचो तो अभिमान गळून पडला. अगदी लहानपणा पासून जात, धर्म , पंथ कशातही भेद न करणारा मी, पण तृतीयपंथीयां कडे बघताना अजूनही मनात उपेक्षा, तिटकारा किंवा दया, कणव या भावना येतात याची जाणीव कार्यक्रम बघताना झाली आणि आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे लक्षात आलं... हे या कार्यक्रमाच यश. सर्वात पहिला सुखद धक्का म्हणजे बळीराम मुतगेकर सारखा नवीन चेहरा प्रास्ताविक करण्यासाठी पोडीयम मागे आला तेंव्हा बसला. त्याने मोजक्या आणि नेमक्या शब्दात प्रास्ताविक केलं . भावना व कादंबरी स्टेजवर आल्या तेंव्हा कादंबरी तृतीय पंथीय आहे हे माहीत होतं म्हणून अन्यथा ती विश्वास बसला नसता इतकी सुंदर आणि ग्रेसफुल दिसत होती. भावनाने अत्यंत अकृत्रिम, सहज शैलीने मुलाखतीची सुरवात केली आणि पुढचा तासभर कसा संपला कळलं नाही. प्रश्नांची उत्तरे द्यायला कादंबरीने सुरवात केली तेव्हा तिचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व पाहून खरंच आश्चर्य वाटलं.. तिने शांतपणे एकेक अनुभव सांगायला सुरवात केली त्यावेळी हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. अशी वेगळी आयडेंटीटी घेऊन मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना किती त्रास सोसावा लागत असेल , त्यांचे काय हाल होत असतील याची दाहक जाणीव कादंबरीचे बोलणे ऐकताना होत होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे कथन करताना तिच्या बोलण्यात राग चीड जाणवली नाही ... अतिशय संयत शब्दात तिने आपलं मनोगत मांडलं. समाजातील एक नागरीक या नात्याने आपण आपल्या सपर्कात येणाऱ्या अशा प्रत्येक बंधु भगिनीं बरोबर मनात उपेक्षा अवहेलना दया अशा भावना न येऊ देता मित्रत्वाची स्नेहाची भावना ठेवून संवाद साधला पाहिजे हे प्रकर्षाने जाणवलं. प्रेसिडेंट लताने तिचा सत्कार करताना तुम्ही मला मुली सारख्याच आहात केंव्हाही माझ्या घरी येत जा असं सांगितल तेंव्हा लता आपल्याच मनातल बोलली असं श्रोत्यांना वाटलं. आत्म परीक्षणाला उद्युक्त करणारा , प्रबोधनाचं कुठलही छापील लेबल न लावता प्रबोधन करणारा, आपल्याला कंफर्ट झोन मधून खेचून काढून अस्वस्थ करणारा अनुभव दिल्याबद्दल सुनील जाधव , अभय देवरे , लता आणि कादंबरी याना मनःपूर्वक धन्यवाद ...??