Maharani Yesubai

Meeting Details

Meeting Date 19 Jan 2024
Meeting Time 19:30:00
Location Seva Sadan School, Pune
Meeting Type Regular
Meeting Topic Maharani Yesubai
Meeting Agenda *मीटिंग क्र. २५* *वार :* शुक्रवार *दिनांक :* १९ जानेवारी २०२४ *वेळ :* संध्या: ७.१५ ते ७.४५ चहा बिस्किट्स संध्या. ७.४५ ते ८.०० रोटरी बिझनेस संध्या. ८.०० ते ९.१५ एक चुकवू नये असा कार्यक्रम.... *महाराणी येसूबाई* या विषयावर अतिशय माहितीपूर्ण आणि रहस्यमय असे व्याख्यान आयोजित केले आहे. व्याख्यात्या आहेत... *अनामिका बोरकर* नाटककार व लेखिका संध्या. ९.१५ नंतर फेलोशीप तरी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे. अभय देवरे *सेक्रेटरी*
Chief Guest Anamika Borkar
Club Members Present 25
Minutes of Meeting आजचे सौ. अनामिका बोरकर यांचे “महाराणी येसूबाई “ या विषयावरचे व्याख्यान खूप सुंदर झाले . आपल्याला , निदान मला तरी ,येसूबाई ही छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी एवढेच माहित होते . आजच्या व्याख्यानात येसूबाईंचे बालपण , लहान वयात झालेला विवाह , शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या सहवासातून मिळालेली राजकारणाची शिकवण आणि त्यातून आलेलं मुत्सद्दीपण , तल्लख स्मरणशक्ती , स्वतःचा आब राखून केलेला तह , शाहूमहाराजांवर केलेले संस्कार हे सगळे स्वभावविशेष माहित झाले . काही प्रसंग तर इतक्या बारीकसारीक तपशिलासह ओघवत्या शैलीमध्ये , कथारुपाने सांगितले , की प्रत्यक्ष डोळ्यांसमोर हे सगळं घडतंय असंच वाटलं . आपल्या आयुष्यात ४ छत्रपतींचा ( शिवाजी महाराज , संभाजी महाराज , राजाराम महाराज आणि शाहू महाराज ) राज्यकारभार पाहिलेली एकमेव महाराणी येसूबाई ! रो. राघवेन्द्र ने आभार प्रदर्शनामध्ये सांगितले , की आजच्या युवापिढीने जर इतिहासाचा अभ्यास केला तर आजकालचे depression , stress याचा बाऊ वाटणार नाही . चविष्ट फेलशिपने मीटिंगची सांगता झाली .