दिवाळी पहाट

Meeting Details

Meeting Date 10 Nov 2023
Meeting Time 07:00:00
Location Seva Sadan School, Pune
Meeting Type Regular
Meeting Topic दिवाळी पहाट
Meeting Agenda *मीटिंग क्र. १७* *वार :* शुक्रवार *दिनांक :* १० नोव्हेंबर २०२३ *स्थळ*: सेवासदन शाळा, एरंडवणे, पुणे *वेळ: सकाळी ६.३० ते ७.००* चहापान *सकाळी. ७.०० ते ७.१५* रोटरी बिझिनेस *सकाळी ७.१५ ते ९.००* रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड व रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी यांनी दिवाळी निमित्त आयोजित केलेली खास ..... *संगीत मैफिल* *गायक* अबोली गद्रे - रानडे व तन्मय बांदिवडेकर या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली दिवाळी दणक्यात साजरी करूयात. आपले मित्र, नातेवाईक यांनाही अवश्य घेवून यावे, फक्त त्यांची उपस्थिती आधी कळवावी. *सकाळी ९.०० नंतर* फेलोशिप *ड्रेस कोड:* सर्वांनी नटून थटून कार्यक्रमाला यावे. *GoM*: रो. सुधीर व भावना दफ्तरदार कृपया सर्वांनी आपली उपस्थिती जरूर नोंदवावी. अभय देवरे *सेक्रेटरी*
Chief Guest
Club Members Present 45
Minutes of Meeting शुक्रवार दिनांक १०नोव्हेंबरला ,रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले . सकाळी ७.३० ला मंगलमय ,भारलेल्या वातावरणात रोटरी क्लब युनिव्हर्सिटी क्लब चे प्रेसिडेंट रो.विष्णू गेडाम यांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात केली .युनिव्हर्सिटी क्लब च्या रो .मंजिरी शहाणे यांनी अतिशय समर्पक शब्दांत कलाकारांचा परिचय करून दिला .पुर्वार्धात गायिका सौ .अबोली रानडे यांनी लोकप्रिय गाणी ,भजन ,नाट्यगीते सादर करुन आपल्या मधुर सुरांनी श्रोत्यांना अक्षरशः खिळऊन ठेवले .उत्तरार्धात उभरते गायक श्री .तन्मय बांदिवडेकर यांनी बंदिश ,ख्याल तसेच लोकप्रिय अभंग पेश करुन आपली शास्त्रीय बैठक किती पक्की आहे हे श्रोत्यांना पटऊन दिले .सिंहगड क्लब च्या मेम्बरशिप डायरेक्टर रो .भावना दफ्तरदार यांनी मोजक्या पण चपखल शब्दांत उपस्थितांचे आभार मानले .या कार्यक्रमाच्या आयोजनात एडमिन डायरेक्टर रो .स्वाती रांजेकर आणि रवी रांजेकर तसेच प्रभारी अध्यक्ष रो .अनुराधा काळे यांचा सिंहाचा वाटा होता.या दिवाळी पहाटच्या मैफिलीचा आनंद मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या श्रोत्यांमुळे द्विगुणीत झाला .