Teacher's Day

Meeting Details

Meeting Date 08 Sep 2023
Meeting Time 07:30:00
Location Seva Sadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Teacher's Day
Meeting Agenda वार : शुक्रवार दिनांक : ८ सप्टेंबर २०२३ वेळ: *संध्या: ७.१५ ते ७.४५ चहापान संध्या. ७.४५ ते ८.०० रोटरी बिझनेस संध्या. ८.०० ते ९.०० # शिक्षक दिनानिमित्त आपल्या क्लब मधील काही शिक्षकांचा सन्मान # "Know Your Rotarian" या कार्यक्रमात रो. तुषार आचार्य व रो. सोनाली आचार्य यांची मुलाखत रो.भावना दफ्तरदार घेणार आहेत. संध्या. ९ नंतर फेलोशिप तरी सर्वांना विनंती आहे की आपण कार्यक्रमास हजर राहावे. मीटिंग वेळेवर सुरू होईल याची नोंद घ्यावी. सर्वांनी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या मोबाईल App वर आपला attendence नोंदवावा. अभय देवरे सेक्रेटरी
Chief Guest
Club Members Present 35
Minutes of Meeting शुक्रवार दिनांक 8सप्टेंबर 2023 रोजी ,नुकत्याच साजरा झालेल्या शिक्षक दिनानिमित्त ,क्लब मधील शिक्षकांचा गौरव करून त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली .कार्यक्रमाची सुरवात नेहा चवरे आणि भावना दफ्तरदार यांच्या सुरेल प्रार्थनेने झाली .गायत्री नाखरेचे सुरेख फलक लेखन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते .सत्कारार्थी मध्ये ,नुकतेच रोटरी परिवारात सामील झालेले रो.क्षमा आणि सतीश कुलकर्णी ,भाऊ इन्स्टिटयूट चे founder member आणि Industrialist रो .संजय इनामदार ,management trainer रो.प्रकाश वसेकर ,बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी training देणारे रो. अभय देवरे,पर्यावरण विषयाचा भारती विद्यापीठातील प्राध्यापक आणि यशस्वी उद्योजक रो.देवा घोरपडे यांचा समावेश होता . त्यानंतर रो.भावना दफ्तरदार यांनी मागील वर्षी रोटरी परिवारात सामील झालेले रो .तुषार आणि सोनाली आचार्य यांची मुलाखत घेतली .नेमक्या प्रश्नउत्तरातून अल्पावधीत मिळवलेल्या यशाचा पट उलगडला .मुलाखत देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले .या कार्यक्रमासाठी रो .नरेश रामन ,डिस्ट्रिक्ट 3150 (आंध्र प्रदेश )चे past RYE डायरेक्टर आणि आताचे community service director हजर होते .त्यांनी त्यांच्या कुटुंबियाबद्दल आणि हैद्राबाद येथे, त्यांचा रोटरी क्लब करत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली . ऍन सुमेधा पाटणकर हिच्या मार्गदर्शनानुसार ठेवलेल्या ,चवदार छोले भटुरे आणि खुसखुशीत करंज्याच्या मेजवानीने कार्यक्रमाची सांगाता झाली .