Shravan Shukravar - Competition

Meeting Details

Meeting Date 01 Sep 2023
Meeting Time 07:30:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Shravan Shukravar - Competition
Meeting Agenda श्रावण महिन्याचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम व सर्वांसाठी दोन स्पर्धा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्पर्धा क्र.१ पाककला स्पर्धा (तिखट पदार्थ - गट १) (गोड पदार्थ - गट २ ) स्पर्धक दोन्ही गटात भाग घेऊ शकतात. पदार्थांसाठी गुण देताना पदार्थाची चव, सजावट आणि पोषणमूल्य हे निकष लावले जातील हे लक्षात घ्यावे. स्पर्धा क्र. २ २. मेंदी काढणे स्पर्धा (मेंदीचे कोन क्लब तर्फे पुरवण्यात येतील ) या दोन्ही स्पर्धा पुरुष आणि स्त्रियांसाठी खुल्या आहेत. त्यानंतर पुरुषवर्गासाठी मजेदार खेळांचे आयोजन ही केले आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी जरीकाठाची साडी आणि पुरुषांनी पारंपरिक पेहराव करणे अपेक्षित आहे. उत्कृष्ट पोषाखासाठी खास बक्षिसे सुध्धा ठेवली आहेत . तरी इच्छुकांनी पाककलेसाठी आपली नावे सुमेधा पाटणकर यांच्याकडे तर मेंदी स्पर्धेसाठी नावे अनुराधा काळे यांच्याकडे द्यावीत. श्रावण शुक्रवार निमित्त खास पक्वांनाची फेलोशिप आहेच. तरी बहुसंख्येने उपस्थित राहा आणि स्पर्धेत भाग घ्या ही विनंती. स्थळ : सेवासदन शाळा वेळ : संध्या. ७.१५ ते ७. ४५ चहा / बिस्किट्स संध्या. ७.४५ ते ८.०० रोटरी बिझनेस संध्या. ८ ते ९ दोन स्पर्धा संध्या. ९ ते ९.१५ बक्षीस वितरण संध्या. ९ नंतर खास फेलोशिप गार्डियन ऑफ द मंथ : रो. शरद देशपांडे रो. अलका देशपांडे तरी सर्वांनी आपली नावे यादीत नोंदवावीत. अभय देवरे सेक्रेटरी
Chief Guest
Club Members Present 30
Minutes of Meeting पाककला स्पर्धेत १0 स्त्रिया आणि ३ पुरुषांनी भाग घेतला होता. त्यात मनीषा अधिकारी हिला दुसरा नंबर आणि तिन्ही पुरुषांना पहिला नंबर मिळाला.