Great Warrior First Bajirao Peshwa & his warfare strategies (श्रीमंत बाजीराव पेशवे व त्यांची युद्धकला ) (Synergy Meeting with RCP D G)

Meeting Details

Meeting Date 28 Jul 2023
Meeting Time 19:30:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Great Warrior First Bajirao Peshwa & his warfare strategies (श्रीमंत बाजीराव पेशवे व त्यांची युद्धकला ) (Synergy Meeting with RCP D G)
Meeting Agenda *मीटिंग क्र. ४* (Synergy Meeting with RCP DG) व्याख्यान विषय *श्रीमंत बाजीराव पेशवे* शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा दरारा संपूर्ण हिदुस्थानभर प्रस्थापित करणारे बाजीराव पेशवे यांचं चरित्र दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे! दुर्दैवानी हे तेजस्वी चरित्र फारसं माहीत नसतं आणि असेलच ते प्रामुख्याने मस्तानी प्रकरण संबंधाने. खरा तेजस्वी इतिहास जाणण्यासाठी, पालखेड लढाईचा थरार ऐकण्यासाठी , मस्तानी व इतर प्रकरणांचे वास्तव जाणण्यासाठी दि. २८ जुलै रोजी डॉ. आदित्य अभ्यंकरांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. बाजीरावांचं खरे चरित्र जाणण्यासाठी व पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अवश्य या व अधिकाधिक संख्येने व्याख्यानात सहभागी व्हा ! तरी सर्वांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अवश्य हजर राहावे.
Chief Guest डॉ. आदित्य अभ्यंकर
Club Members Present 40
Minutes of Meeting शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा दरारा संपूर्ण हिंदुस्थान भर प्रस्थापित करणाऱ्या थोरल्या बाजीरावांचा खरा ,तेजस्वी इतिहास पुढच्या पिढयांना पोचविण्यासाठी ,पालखेड लढाईचा थरार ऐकण्यासाठी तसेच मस्तानी व इतर प्रकरणाचे वास्तव जाणण्यासाठी शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभाग प्रमुख 'डॉ .आदित्य शंकर अभ्यंकर 'यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .आपल्या विद्वत्ताप्रचुर वाणीने समस्त श्रोत्यांना सुमारे दीड तास त्यांनी खिळवून ठेवले .उच्च दर्जाचे व्याख्यान ऐकण्याचा हा अनुभव शब्दातीत होता. रोटरी क्लब सिंहगड रोड आणि रोटरी क्लब डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .PP रो.अनुराधा काळे यांनी पाहुण्याची ओळख करून दिली आणि PP रो .श्रीकांत पाटणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .निमंत्रित पाहुण्यामुळे आणि रोटरी सदस्य मोठ्या संख्येनी उपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली .