Audio Visual presentation of old poems

Meeting Details

Meeting Date 14 Jul 2023
Meeting Time 19:30:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Audio Visual presentation of old poems
Meeting Agenda *साप्ताहिक सभा क्र. २* *शुक्रवार, दिनांक १४ जुलै* *कार्यक्रम: शोध कवितेचा* मंडळी, आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या काही कविता, दृक आणि श्राव्य पद्धतीने, अतिशय मनोरंजक पद्धतीने सादर केलेला, अनेक दिगज्जानी गौरवलेला अशा १ तास ३० मिनिटांच्या कार्यक्रमाची मेजवानी आपल्याला शुक्रवारी मिळणार आहे. तेंव्हा चुकवू नये असाच हा कार्यक्रम आहे. एक आगळा - वेगळा कार्यक्रम.. ज्याची संकल्पना नि दिग्दर्शन केले आहे श्री्युत महेश पाटणकर यांनी. बाकी जास्त माहिती देणार नाही, प्रत्यक्ष येऊनच ऐका नि बघा. १३ लोक स्टेज वर काम करणार आहेत. टिपिकल कवितांचा हा कार्यक्रम नाहीच.. आपली उपस्थिती लगेच कळवा.. अभय देवरे सेक्रेटरी
Chief Guest Mahesh Patankar
Club Members Present 37
Minutes of Meeting कल्पक, पुणे निर्मित आणि महेश पाटणकर दिग्दर्शित "शोध कवितेचा" कार्यक्रम फारच छान झाला. कार्यक्रमातील कलाकारांनी खूपच सहज सुंदर अभिनय करून, गोष्टीत गुंफून कविता सादर केल्या. कलाकारांची सहजता, पाठांतर तर वाखणण्याजोगे होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कवितांची निवड ही छान होती. कवी गणेश हरी पाटील यांची "देवा तुझे किती सुंदर आकाश" ही कविता खूप वर्षांनी पूर्ण ऐकल्यामुळे मन ३०-४० वर्षे पाठीमागे गेले. त्याची चाल छान आहेच पण ती सादर ही चांगली केली गेली. त्यानंतर बोरकरांच्या "औदुंबर" मधील एक कविता "ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेवून" ही कविता ऐकून प्रत्येकाला आपल्या खेड्यातल्या गावी गेल्यासारखं वाटलं.... दामोदर अच्युत काळे यांची "वाटते सोनुली" कविता पण चांगली झाली. कवी पाठक यांच्या "खबरदार जर टाच मारुनी जात पुढे चिंधड्या" ही कविता दृक श्राव्य माध्यमात खूप प्रभावी वाटली. त्यातील गोष्टीत दाखवल्याप्रमाणे शेवटी त्या मुलाला शिवाजी महाराज जेव्हा खुश होवून आपले खरे रूप दाखवतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. प्र. के. अत्रेंच्या "आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक" ह्या कवितेने तर खूप धमाल आणली. केवढी जुनी ती कविता आणि तिचा आशय...आजच्या पिढीला हेवा वाटेल अशा वातावरणात प्रेक्षक आपसूकच गेले. "पोस्टमन" कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ती कविता ४ वृत्तात आहे हे आज खूप वर्षांनी परत एकदा आठवले. ग. ल. ठोकळ यांची "भिकारीण" ही कविता, तिचा आशय आणि सादर करणाऱ्या कलाकाराने केलेल्या अभिनयाने बहुतेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या आणि मन हेलावून गेले. बालकवींची सुप्रसिद्ध कविता "श्रावणमासी हर्ष मानसी" सुरू झाल्यावर प्रेक्षक आपसूकच ती कविता म्हणू लागले आणि तीच कविता कलाकारांनी "वृंदावनी सारंग" रागात वेगळ्या चालीत अतिशय छान पेश केली. कवी निकुंभ यांची "घाल घाल पिंगा वाऱ्या" ह्या कवितेने तर सर्व Anns मनाने आपापल्या माहेरी पोचल्या, व्याकूळ झाल्या, त्यांच्या मनाची चलबिचल अंधारात सुध्धा जाणवत होती. कवी केशव कुमार यांची "खाली आणि वर"या कवितेने समाजातल्या दोन स्तरांची गडद जाणीव करून दिली. कवी लिमये यांच्या "शाळेचा रस्ता" या संग्रहातील "शाळेस रोज जाताना, विघ्ने येती नाना" याची चाल नादमधुर होती. तिला "मेरे दिलकी घडी करे टिक टिक टिक" या चालीवर छान म्हणून दाखविले. शाळेला उशीर होण्याची रोजची नवी कारणे प्रत्येकाला आठवत होती... रस्तातला फुगेवाला, झाडे व वेली यांच्याशी खेळत, रमत गमत शाळेला जाणे हे प्रत्येकाने अगदी मनोमन अनुभवले काल.... कवी पटवर्धन यांच्या "अमुचे घर" या कवितेत दारातील रांगोळी, दाण्याचा लाडू, भातुकली, कट्टी व बट्टी यांची चित्रे खूपच बोलकी होती. त्यानंतर...खरी धमाल आणली "भानुदास" या कवीच्या "पडू आजारी" कवितेने..त्याचा सस्पेन्स दिग्दर्शकाने शेवटपर्यंत छान टिकवून ठेवला. रवी आणि स्वाती रांजेकर यांच्या गुण ग्राहकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. खूप सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले काल ह्या दोघांनी...खूप खूप धन्यवाद ??