Installation of President and BOD

Meeting Details

Meeting Date 09 Jul 2023
Meeting Time 19:00:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Club Assembly
Meeting Topic Installation of President and BOD
Meeting Agenda नवीन रोटरी वर्ष १ जुलै रोजी सुरू झालं.... नवीन वर्षाचा आज पहिला शुक्रवार.... आपला मीटिंग चा दिवस... पण मंडळी आज शुक्रवारी आपली नेहमीची मीटिंग होणार नाहीये. त्या ऐवजी आपली पहिली मीटिंग रविवार दिनांक ९ जुलै रोजी होणार आहे. ९ जुलै रोजी आपली प्रेसिडेंट लता आणि तिचे डायरेक्टर यांचा "Installation Ceremony" होणार आहे. तरी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे या पदग्रहण सोहळ्याचं... रविवारी दिनांक ९ जुलै ला सर्वांनी ठीक ६.३० वाजता आपल्या सेवासदन हॉल वर यायचे आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे तरी कुणी उशीर करू नये ही विनंती... अभय देवरे सेक्रेटरी
Chief Guest DGN Rtn Santosh Marathe
Club Members Present 55
Minutes of Meeting रौप्य महोत्सवी वर्षातील प्रेसिडेंट लता व तिची BoD पदग्रहण समारंभ काल प्रेसिडेंट लता आणि तिची BoD यांचा पदग्रहण समारंभ अतिशय उत्साहात पार पडला. समारंभ व्यवस्थित पार पाडण्यासाठी BoD मधील सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली. हॉलच्या सजावटीकरिता देवाने घेतलेले निर्णय, कष्ट आणि कल्पकता याचे खूप कौतुक झाले. दृष्ट लागण्यासारखा सजला होता काल सेवासदन हॉल! फुग्यांचा रंग आपल्या यावर्षीच्या रोटरी लोगो ला साजेसा होता. ? अवंतीने रांगोळी साठी सुचविलेल्या बसवराज याच्या रांगोळीची खूप वाहवा झाली. कार्यक्रमाची सुरुवात जुईली लागू यांच्या अतिशय सुरेख गणेश वंदना ने झाली. ? त्याचप्रमाणे MoC म्हणून अनुराधा व सतीशने अतिशय छान काम केले, कार्यक्रमात सुसूत्रता आणली. गिरीश काळे यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना Guest of Honour म्हणून आमंत्रित केले. देवा, सुधीर आणि सुनीलने सर्व DGN, District Officers ना निमंत्रित करून त्यांची सर्व व्यवस्था चोख पाहिली. Ann श्रेया आपटे, रंजना रांदेर, संजीवनी जोशी, अवंती यांनी पाहुण्यांचे छान स्वागत केले. एकूणच कार्यक्रम देखणा झाला. सर्वात कडी म्हणजे कालच्या कार्यक्रमाला १४०+ लोकांची उपस्थिती होती. रौप्यमहोत्सवी वर्षांची सुरुवात असल्याने क्लबने मागील २५ वर्षातील निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान केला. तसेच क्लबमध्ये २५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा पण सत्कार केला. २५ वर्षातील महत्वाचे प्रोजेक्ट्सचे फोटो लावले होते. आजच्या निमित्ताने ३ lady rotarians ना क्लबच्या परिवारात सामावून घेतले. पदग्रहण समारंभानिमित्त साद-प्रतिसाद या अंकाचे प्रकाशन केले. संपादक तुषार आचार्य व श्रीकांत बेडेकर आहेत. फाउंडेशन डायरेक्टर साधनाने काल USD 4400+ रकमेचे फाउंडेशन साठी आपल्या मेंबर्स कडून declaration घेतले आणि यावर्षीच्या टार्गेट पेक्षाही जास्त रक्कम जमा करण्याची हमी घेतली. ग्रेट साधना ? . आपला क्लब CSR Fund साठी प्रसिद्ध आहे. दीपक ने काल ZS Associate कडून Robotex साठी रू. 45 लाखांचा CSR मिळवला. ? कालचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीची चविष्ट फेलोशिपची व्यवस्था अलका व शरद ने छान पार पाडली. ? कालचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी साठी Admin Director स्वाती रांजेकरनी खूप मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला. ? शरद लागू यांनी लॅपटॉपची व्यवस्था चोख बजावली. ☑️ सुनील व स्नेहा ने पाहुण्यांसाठी गिफ्ट, केटरींग व्यवस्था छान पार पाडली. ? मिलिंद ने CSR पार्टनर Vitesco Technologies Pvt Ltd चे प्रतिनिधी आरती, शिव विद्या प्रतिष्ठान चे शिल्पा, संतोष सर यांना निमंत्रित करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. ? लता च्या आग्रहाखातर डिनर साठी खास डिंगणकर केटरर्स ना बोलावून फेलोशिप कमिटी (व्यंकटेश/सुमेधा) यांनी छान मेन्यू ठरविला. ?? नवीन वर्षाचा पहिलाच कार्यक्रम पार पाडण्यासाठी जागेअभावी उल्लेख न करू शकलेल्या खूप जणांचा यात सहभाग आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी कालच्या कार्यक्रमाला उपस्थित (१४०+) राहून रंगत आणलीत. Attendence Committee ? या कार्यक्रमा साठी मौलिक सूचना ट्रेनर डॉ. श्रीकांत पाटणकर यांच्याकडून मिळाल्या.? या सर्व आपल्याच मेंबर्सचे आभार मानून मी त्यांना परके करणार नाहीये परंतु कृतज्ञता मात्र नक्कीच व्यक्त करीन. ? अभय देवरे सेक्रेटरी